झापोरिझ्झिया अणूप्रकल्प कह्यात घेतल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला

यापूर्वी रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे मेजर जन. इगोर कोनाशेन्कोव यांनी ‘रशियाच्या सैन्याने झापोरिझ्झिया अणूउर्जा केंद्र कह्यात घेतले असून त्याचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू आहे’, असे सांगितले होते.

युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा सैनिकांकडून छळ

संयुक्त राष्ट्रांत युक्रेनला साहाय्य न केल्याचा राग !
युक्रेनच्या नागरिकांकडूनही वाईट वागणूक !

युद्ध आणखी १० दिवसांपेक्षा अधिक चालले, तर रशिया दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचेल ! – संरक्षण तज्ञांचा दावा

युद्धावर प्रतिदिन व्यय (खर्च) होत आहेत १ लाख १२ सहस्र कोटी रुपये !

बेलारूस रशियाच्या बाजूने युद्धात उतरणार !

अमेरिकेने हा निर्णय ‘धोकादायक’ असल्याचे सांगत त्यास विरोध केला आहे, तसेच ‘चीननेही या निर्णयाला विरोध करावा’, असे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही या कृतीला ‘दायित्वशून्य पाऊल’ असल्याचे सांगत टीका केली आहे.

भारताने अमेरिकेच्या ऐवजी रशियाला साहाय्य केल्याने भारतावर भविष्यात परिणाम काय होतील ?

‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’त अमेरिकेने एक विधेयक मांडले होते. तेव्हा भारताने रशियाला अप्रत्यक्ष सहकार्य केले. त्यामुळे रशियाचा निषेध करणारे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. याचा भारतावर काय परिणाम होईल, याचे विश्लेषण पाहूया.

रशियाने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे वापरली, तर युद्ध लवकर संपेल ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की स्वत: सैनिकी पोषाखामध्ये सैन्याच्या समवेत आहेत. युक्रेनचे सैन्य लढत आहे आणि त्याचे नेतृत्वही लढण्यासाठी सिद्ध आहे. यामुळे रशियाला युक्रेनला पूर्ण कह्यात घ्यायचे असेल, तर त्याला वेळ लागू शकतो.

रशियाशी चर्चेला सिद्ध; परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की

रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, बुडापोस्ट, इस्तंबूल आणि बाकू यांपैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस सिद्ध आहोत.

युक्रेन-पोलंड सीमेवर सुरक्षारक्षकांकडून भारतीय विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

युक्रेन-पोलंड सीमेवर युक्रेनच्या सुरक्षारक्षकांनी केवळ युक्रेनच्या नागरिकांना पोलंडमध्ये जाण्याची अनुमती दिली, तर भारतियांना बाजूला काढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

युक्रेनवासियांना ‘इस्कॉन’चे साहाय्य !

‘देशातील गरजू नागरिकांना साहाय्य करण्यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत. संकटात असलेल्या नागरिकांना साहाय्य करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत’, अशी माहिती ‘इस्कॉन’चे कोलकाता येथील उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिली.