झापोरिझ्झिया अणूप्रकल्प कह्यात घेतल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळला

झापोरिझ्झिया अणूप्रकल्प

कीव (युक्रेन) – युरोपातील सर्वांत मोठे झापोरिझ्झिया अणूउर्जा केंद्र कह्यात घेतल्याचा रशियाचा दावा युक्रेनने फेटाळून लावला. यापूर्वी रशियाचे संरक्षण मंत्रालयाचे मेजर जन. इगोर कोनाशेन्कोव यांनी ‘रशियाच्या सैन्याने झापोरिझ्झिया अणूउर्जा केंद्र कह्यात घेतले असून त्याचे कामकाज नेहमीप्रमाणे चालू आहे’, असे सांगितले होते. रशियाचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे, असे ‘एनरगोएटम’ या युक्रेन सरकारच्या अणू आस्थापनाने म्हटले आहे.