युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा सैनिकांकडून छळ

  • संयुक्त राष्ट्रांत युक्रेनला साहाय्य न केल्याचा राग !

  • युक्रेनच्या नागरिकांकडूनही वाईट वागणूक !

पोलंडच्या सीमेवर पोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा सैनिकांकडून छळ

कीव (युक्रेन) – युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी तेथील भारतीय विद्यार्थी पोलंडच्या सीमेवर धाव घेत आहेत; मात्र तेथे त्यांना युक्रेन सैनिक आणि पोलीस यांच्याकडून छळाला समोरे जावे लागत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दावा केला आहे की, युक्रेनचे नागरिकही त्यांच्याशी वाईट वागत आहेत.

१. याविषयी एका भारतीय विद्यार्थ्याने एक व्हिडिओ प्रसारित करून सांगितले की, येथे कडाक्याची थंडी असतांना आम्हाला एखाद्या बंदीवानाप्रमाणे ठेवले आहे आणि खाण्यापिण्यास अन् आश्रय देण्यास नकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत युक्रेनच्या संदर्भातील प्रस्तावावरील मतदानात सहभागी न झाल्यावरून आमचा छळ करण्यात येत आहे.

२. काही विद्यार्थ्यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये ‘सैनिक भीती निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार करत आहेत, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करत आहेत’, असे सांगितले आहे.