चिंचवड (जिल्हा पुणे) – क्रांतीवीर चापेकर बंधूंचे स्मारक हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे असून देशासाठी भूषणास्पद आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुनर्निमाण करून स्मारक देशासाठी प्रेरणास्थळ बनवले आहे. स्मारकामुळे नव्या पिढीला चापेकरांचे कार्य, इतिहास माहिती होईल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सुवर्ण महोत्सवाचा सांगता समारंभ राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.