ओबीसींना ज्‍या निकषावर आरक्षण दिले, त्‍याच निकषावर आम्‍हालाही आरक्षण द्या ! – मनोज जरांगे-पाटील

१ डिसेंबरपासून प्रत्‍येक गावात साखळी उपोषण चालू करा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले. ते विटा येथे १७ नोव्‍हेंबरला सकल मराठा समाजाच्‍या वतीने आयोजित सभेत बोलत होते.

अंबड (जिल्‍हा जालना) येथे ओबीसी नेत्‍यांची ‘आरक्षण बचाव एल्‍गार सभा’ होणार !

जालना जिल्‍ह्यातील अंबड येथे १७ नोव्‍हेंबर या दिवशी ओबीसी आणि भटके विमुक्‍त आरक्षण बचाव एल्‍गार सभा आयोजित करण्‍यात आली आहे.

मराठा आंदोलनविरोधी वक्‍तव्‍य करणारे विजय वडेट्टीवार यांना धमकी !

धमकी मिळाल्‍यावर विजय वडेट्टीवार यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्‍याची मागणी केली आहे.

बीड येथे ऐन दिवाळीत केली पोलिसांनी धरपकड; बीड जाळपोळ प्रकरणी १८१ जणांची दिवाळी कारागृहात !

काही जण पोलीस कोठडीत, तर काही कारागृहात आहेत. त्‍यामुळे या आरोपींना दिवाळी कारागृहात साजरी करण्‍याची वेळ आली आहे. विशेष म्‍हणजे या घटनांमध्‍ये पोलिसांनी आणखी ४०० जणांची ओळख पटवली आहे.

भोकरदन (जिल्‍हा जालना) येथे गावबंदीवरून २ गटांत झालेल्‍या हाणामारीत सरपंचांसह ७ जण घायाळ !

नेत्‍यांना गावबंदी असल्‍याचे फलकही लावले आहेत. काही तरुणांनी हे फलक फाडले. त्‍यावरून जिल्‍ह्यातील भोकरदन येथील बोरगाव जहागीर येथे २ गटांत जोरदार हाणामारी झाली.

राजकीय नेत्यांच्या दिवाळी फराळाला गेल्यानंतर त्यांना आरक्षणाविषयी जाब विचारा !

मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते.

गंगाखेड (जिल्हा परभणी) शहरात भूमीपूजनासाठी आलेल्या आमदारांना विरोध करून माघारी पाठवले !

गंगाखेड येथील ‘मराठा आरक्षण समन्वय समिती’चे तालुकाध्यक्ष श्रीकांत भोसले म्हणाले की, आरक्षण हा समाजाचा भावनिक विषय असल्याने आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी कोणताही राजकीय कार्यक्रम घेऊन मराठा समाजबांधवांच्या भावना दुखावू नये.

37th National Games : खेळाडूंसाठी सर्व सरकारी खात्यांमध्ये ४ टक्के आरक्षण ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्याची ओळख पूर्वी केवळ पर्यटनासाठी होती आणि आता क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्यात साधनसुविधांसमवेतच मानवी संसाधनही निर्माण झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्याला झालेला हा लाभ आहे.

आरक्षणाविषयी श्‍वेतपत्रिका काढा ! – खासदार उदयनराजे भोसले

मराठा आरक्षणासाठी स्‍वतःच्‍या रक्‍ताने लिहिलेले पत्र खासदार उदयनराजे भोसले यांना देण्‍यासाठी पंढरपूरचे शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्‍वर गुंड हे दोन मराठा सातारा येथे आले.

कार्तिकी एकादशी दिवशीच्‍या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी महापूजेला उपमुख्‍यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही !

‘मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते करू देणार नाही’, अशी चेतावणी मराठा आंदोलनकर्त्‍यांनी दिली होती.