श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय !
पंढरपूर – कार्तिकी एकादशी या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी महापूजेला कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार नाही, तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीच्या भावना शासनाला कळवू, असे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. ‘मराठा समाजाला आरक्षण द्या. नाहीतर कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करू देणार नाही’, अशी चेतावणी मराठा आंदोलनकर्त्यांनी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर या दिवशी ‘कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजेला बोलावायचे’ या विषयावर मंदिर समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
अजित पवार की देवेंद्र फडणवीस? कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान कोणाला?#AjitPawar #KartikiEkadashi #DevendraFadnavis #कार्तिकीएकादशी #Pandharpur pic.twitter.com/X7hI1wzQia
— Mumbai Tak (@mumbaitak) November 9, 2023