जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गावागावांत राजकीय नेते आणि पदाधिकारी यांना गावबंदी केली आहे. नेत्यांना गावबंदी असल्याचे फलकही लावले आहेत. काही तरुणांनी हे फलक फाडले. त्यावरून जिल्ह्यातील भोकरदन येथील बोरगाव जहागीर येथे २ गटांत जोरदार हाणामारी झाली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सरपंचांसह ७ तरुण घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात फलक काढून मारहाण करणार्या ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.