शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी धुळखात पडून !
शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणार्या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्न पडत आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणार्या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्न पडत आहे.
कराची स्वीट्स या नावाने अनेक दुकानांची साखळी देशातील प्रमुख शहरे आणि महानगरे यांमध्ये आहे. मुंबईत अनेक ठिकाणी ही दुकाने आहेत. कराची पाकिस्तानातील आहे, त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो.
गुन्हा नोंद असणार्या नगरसेवकांचा जनतेला आधार वाटेल का ? जनतेने कोणाला निवडून द्यायचे हे ठरवायला हवे.
शहर आणि परिसरात ५० हून अधिक घरफोड्या करणार्या सनिसिंग दूधानी आणि सोहेल जावेद शेख यांच्यासह एका अल्पवयीन चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
महानगरपालिकेतील विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, उपक्रम यांसाठी आणि पदाधिकारी अन् अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप, हार-तुरे देण्यासाठी, तसेच फुलांची सजावट आदी साहित्यासाठी प्रतिदिन साडेपाच सहस्र रुपये व्यय करण्याचा प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाने सिद्ध केला आहे.
विजय गुरनुले आणि अविनाश महादुले या मावसभावांनी दळणवळण बंदीच्या काळात ‘मेट्रो रिजन ट्रेडिंग कंपनी’ या आस्थापनाच्या नावाखाली ३ सहस्र लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे.
जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटक आणि नागरिक यांच्यासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळेही खुली करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात १३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र १०३ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ७९९ आहे.
कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे.
उसगाव वडाकडे येथे एका अज्ञात वाहनाने १८ नोव्हेंबर या दिवशी सकाळी एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीचा चालक पाळी येथील चंद्रकांत धाली आणि मागे बसलेली पाळी येथील आलिशा फर्नांडिस यांचे जागीच निधन झाले.