शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने ‘घराघरात मनामनात शंभुराजे’ या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी !

घराघरात मनामनात शंभुराजे या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे कार्यकर्ते

कोल्हापूर, १५ मे (वार्ता.) – महाराष्ट्रातील नामवंत असलेल्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने दळणवळण बंदीच्या सर्व नियमांचे पालन करत ‘घराघरात मनामनात शंभुराजे’ या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी ६ वाजता रुईकर कॉलनी येथील संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास मंत्रोच्चारात रुद्र जलाभिषेक करण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शंभुराजे मंचचे अध्यक्ष श्री. सूरज ढोली, अभिजीत इंगळे, प्रथमेश पाटील, विक्रम पाटील, सूर्यभान ढोली हे उपस्थित होते. यानंतर सर्व मावळे आणि शंभुराजे मंचच्या प्रत्येक शाखेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे अथवा प्रतिमेचे पूजन केले.

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन

शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतांना शिवप्रेमी

कोल्हापूर – शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६४ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना १४ मे या दिवशी विनम्र अभिवादन करण्यात आले. सकाळी ७ वाजता रुईकर कॉलनी येथील छत्रपती शंभुराजेंच्या मूर्तीस जलाभिषेक करण्यात आला. ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र यांचे पठण करून महाराजांची गारद देण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना साखर पेढ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष श्री. साताप्पा काडाव, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे, सर्वश्री संदीप पाडळकर, सुशांत शिंदे, प्रशांत जाधव, प्रवीण कुरणे, प्रशांत पाटील, गणेश मांडवकर, तुषार खोंद्रे यांसह अन्य उपस्थित होते.