इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांचे माहेर सांगली येथे आहे. सांगली जिल्हा महिला संघटनेच्या वतीने ज्या महिलांचे माहेर सांगली येथे आहे त्यांच्यासाठी २५ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ‘व्हर्च्युअल संमेलना’चे आयोजन केले होते. यात ४०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. या सर्वांसाठी ‘व्हॉट्सअॅप’ गट बनवण्यात आला होता. या गटासाठी सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा ‘व्हिडिओ’ बनवला. हा ‘व्हिडिओ’ ‘यूट्यूब’ वर ‘अपलोड’ करून याची लिंक वरील गटांमध्ये पाठवली. हा ‘व्हिडिओ’ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.
प्रारंभी गट सिद्ध केल्यावर या गटात महिला योगासने, गायन, नृत्य, स्वयंपाक, लंघन यांसह विविध विषयांची माहिती पाठवत असत. ही माहिती पाहून सौ. सुजाता भंडारी यांनी या गटाच्या व्यवस्थापकांना साधनेच्या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी अनुमती मागितली. व्यवस्थापकांनी ती दिल्यावर ७ मे या दिवशी त्यांनी वरील माहितीची ‘लिंक’ ‘व्हर्च्युअल संमेलना’च्या गटात पोस्ट केली. ही माहिती अनेकांनी आवडल्याचे सांगितले.