कुडाळ – शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने १४ मे या दिवशी सकाळी ९ वाजता शहरातील श्री देव मारुति मंदिर धर्मशाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना शिवप्रेमी सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. रमाकांत नाईक म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे; पण रक्तदान करून दुसर्याला सुरक्षित करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण चालू झालेले आहे. लस घेतलेल्या युवकांना दुसरी लस घेतल्यानंतर एकूण ४२ ते ५० दिवस रक्तदान करता येणार नाही. रक्तदाते हे १८ ते ४५ वर्षे वयोगटातील अधिक असल्याने पुढील काही मास रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस घेण्यापूर्वी तरुणांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे.