
सांगली, १३ मे (वार्ता.) – ‘वन्दे मातरम् शिवोत्सव’ मंडळाच्या वतीने गेली ३६ वर्षे शिवोत्सव साजरा केला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या निमित्ताने या उत्सवात योगदान देणारे शिवभक्त शाहीर, तुतारी वादक, हलगी वादक, तलवार दांडपट्टा खेळणारे, मंडप, ध्वनीक्षेपक यंत्रणावाले अशा शिवभक्तांच्या २०० कुटुंबियांना श्री. नितीन शिंदे यांच्याकडून जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रथम भाजप नेते माजी आमदार श्री. नितीन शिंदे आणि भाजप नगरसेविका (सौ.) स्वाती शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून मूर्तीचे पूजन केले. या प्रसंगी सुनिता इनामदार, प्रसाद रिसवडे, संतोष पाटील, सुरेश गरड उपस्थित होते.
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी