सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ अभियंत्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

  • कोरोनाच्या संकटकाळातही लाच मागितली जाणे, हा स्वार्थांधतेचा कहर होय !
  • समाजाला धर्मशिक्षण नसल्याने ‘स्वार्थांधता हे पाप आहे’, ही जाणीव नागरिकांच्या मनात नाही. त्यामुळे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !

सातारा, १३ मे (वार्ता.) – शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी देण्यासाठी एका शेतकर्‍याला पाच सहस्र रुपयांची लाच मागणार्‍या वीज वितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राहुल सोनवले असे या कनिष्ठ अभियंत्याचे नाव असून ते ओगलेवाडीचे रहिवासी आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राहुल सोनवले हे कराड तालुक्यातील वाठार येथील वीज वितरण कार्यालयात कामाला आहेत. सध्या शेतकर्‍यांना नवीन वीज जोडण्या देणे चालू आहे.