अयोध्येतील श्रीरामाची भूमी हिंदूंना मिळवून देण्यात दायित्वपूर्ण भूमिका निभावणारे दिवंगत के.के. नायर !
‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले.