अलीगड येथील फैजान नावाच्या आतंकवाद्यालला अटक
अलीगड (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने येथून इस्लामिक स्टेटशी संबंधित फैजान बख्तियार याला अटक केली आहे. त्याची माहिती देणार्याला २५ सहस्र रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. फैजान अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयात शिकत होता. (‘या विश्वविद्यालयात शिकणार्या सर्वच मुसलमान विद्यार्थ्यांची चौकशी करा’, अशी मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक) तो ‘सामू’ या कट्टरतावादी विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होता. तो इस्लामिक स्टेटच्या अलीगड गटाशी संबंधित आहे. तो मूळचा प्रयागराजचा रहाणारा आहे. अब्दुल समद मलिक याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने फैजानचे नाव पोलिसांना सांगितले होते. ‘अलीगड गटा’चे आतंकवादी श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी घातपात करण्याचा कट रचत होते. या गटातील ८ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाबाबरी पाडणार्या कारसेवकांवर टीका करणारे निधर्मीवादी राजकीय पक्ष श्रीराममंदिराच्या ठिकाणी घातपात करणार्या मुसलमान आतंकवाद्यांविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |