श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला राज्यातून जाणार्‍या कुणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या ! – गृहमंत्री जी. परमेश्‍वर, कर्नाटक

कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची पोलिसांना सूचना !

गृहमंत्री जी. परमेश्‍वर

बेंगळुरू (कर्नाटक) – श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार्‍या राज्यातील कोणत्याही भक्ताला त्रास होणार नाही, कोणतीही अहितकारक  घटना घडणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी सूचना राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांनी दिली आहे.