अयोध्येतील श्रीरामाची भूमी हिंदूंना मिळवून देण्यात दायित्वपूर्ण भूमिका निभावणारे दिवंगत के.के. नायर !

‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले. त्यांनी काही काळ केरळमध्ये काम केले आणि ते त्यांचा प्रामाणिकपणा अन्  शौर्य यांसाठी ओळखले गेले आणि ‘लोकांचे सेवक’ म्हणून नाव कमावले. वर्ष १९४५ मध्ये ते उत्तरप्रदेश राज्यात ‘नागरी सेवक’ म्हणून रुजू झाले. त्यांनी विविध पदांवर काम केले आणि १ जून १९४९ या दिवशी फैजाबादचे उपायुक्त अन् ‘जिल्हा दंडाधिकारी’ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

१. के.के. नायर आणि गुरुदत्त सिंग यांच्या अहवालात अयोध्येत श्रीराममंदिर असल्याचा पुनरुच्चार

बालक रूपातील राम विग्रहमला अयोध्येत अचानक ठेवण्यात आल्याच्या तक्रारीनंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी उत्तरप्रदेश सरकारला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. राज्याचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी के.के. नायर यांना तेथे जाऊन चौकशी करण्याची विनंती केली. नायर यांनी त्यांच्या हाताखाली असलेले अधिकारी गुरुदत्त सिंग यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. सिंग यांनी के.के. नायर यांना सविस्तर अहवाल सादर केला. त्यांच्या अहवालात असे म्हटले आहे, ‘हिंदू अयोध्येला रामाचे जन्मस्थान (रामलला) म्हणून पूजतात; पण तिथे मशीद असल्याचा दावा करून मुसलमान समस्या निर्माण करत होते.’ सिंग यांच्या अहवालात ते ‘हिंदु मंदिर’ असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला. ‘तेथे मोठे मंदिर बांधावे आणि त्यासाठी सरकारने भूमी द्यावी अन् त्या भागात मुसलमानांना बंदी घालावी’, अशी सूचना त्यांनी केली. त्या अहवालाच्या आधारे नायर यांनी मुसलमानांना मंदिराच्या ५०० मीटरच्या परिघात जाण्यास मनाई (बंदी) करणारे आदेश जारी केले. (हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सरकार किंवा न्यायालय आजपर्यंत ही बंदी उठवू शकलेले नाही.)

के.के. नायर

२. नायर यांनी बालक रामललाची मूर्ती हटवण्यास नकार देणे

हे ऐकून नेहरू भडकले आणि अस्वस्थ झाले. ‘राज्य सरकारने या भागातून (अयोध्येतील जन्मस्थानापासून) हिंदूंना तातडीने बाहेर काढण्याचे आणि बालक रामललाला हटवण्याचे आदेश द्यावेत’, अशी त्यांची इच्छा होती. मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी नायर यांना तात्काळ हिंदूंना बाहेर काढण्याचे आणि बालक रामललाची मूर्ती हटवण्याचे आदेश दिले; पण नायर यांनी नकार दिला अन् दुसरीकडे त्यांनी ‘बालक रामाची प्रतिदिन पूजा करावी’, असा आदेश जारी केला. ‘पूजेचा व्यय आणि पूजा करणार्‍या पुजार्‍याचे वेतन सरकारने द्यावे’, असेही त्या आदेशात म्हटले आहे.

३. नेहरूंनी नायर यांना नोकरीतून काढणे; पण अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आदेश देणे

या आदेशाने घाबरलेल्या नेहरूंनी लगेच नायर यांना सेवेतून काढण्याचे आदेश दिले. हे आदेश झाल्यावर नायर हे अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी स्वतः नेहरूंविरुद्ध यशस्वी युक्तीवाद केला. ‘नायर यांना पुन्हा कामावर घेऊन त्याच ठिकाणी काम करण्यास अनुमती द्यावी’, असे आदेश न्यायालयाने दिले. न्यायालयाचा आदेश म्हणजे नेहरूंच्या चेहर्‍याला काळी शाई फासल्यासारखे होते.

नायर यांनी अयोध्या प्रकरणाचा पहिला सामना केला होता स्वातंत्र्यानंतर. संपूर्णपणे हे प्रकरण के.के. नायर यांच्याद्वारे हाताळले गेले आणि आताही त्यांनी अधिकारी म्हणून दिलेले आदेश पालटणे हिंदुद्वेषी घटकांना शक्य झालेले नाही. नायर यांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे आजही रामललाची पूजा आणि दर्शन चालूच आहे.

४. सौ. शकुंतला नायर यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विधानसभेच्या निवडणुकीत सहस्रो मतांच्या फरकाने हरवणे

हा आदेश ऐकून अयोध्येतील रहिवासींनी के.के. नायर यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली; पण ‘सरकारी नोकर असल्याने निवडणुकीला उभे राहू शकत नाही’, असे नायर यांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिले. ‘नायर यांच्या पत्नीने निवडणूक लढवावी’, अशी अयोध्येतील रहिवाशांची इच्छा होती. लोकांच्या विनंतीनुसार सौ. शकुंतला नायर उत्तरप्रदेशच्या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीत अयोध्येत उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्या. त्या वेळी देशभर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले; पण अयोध्येत नायर यांच्या पत्नीविरुद्ध निवडणूक लढवणारा काँग्रेसचा उमेदवार मात्र सहस्रो मतांच्या फरकाने पराभूत झाला. सौ. शकुंतला नायर यांनी १९५२ मध्ये जनसंघात प्रवेश केला आणि संघटनेचा विकास करण्यास प्रारंभ केला.

५. नायर दांपत्य संसदेच्या निवडणुकीत जिंकणे

हादरलेले नेहरू आणि काँग्रेस यांनी के.के. नायर यांच्यावर दबाव आणण्यास प्रारंभ केला. त्यामुळे नायर यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात ‘अधिवक्ता’ म्हणून काम चालू केले. वर्ष १९६२ मध्ये संसदेच्या निवडणुका घोषित झाल्या, तेव्हा लोकांनी नायर आणि त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याविषयी संमती मिळवण्यात यश मिळवले. ‘त्यांनी अयोध्येविषयी बोलावे’, अशी लोकांची इच्छा होती आणि लोकांनी नायर दांपत्याला बहराईच अन् कैसरगंज दोन्ही मतदारसंघ जिंकण्यास साहाय्य केले. ती ऐतिहासिक कामगिरी होती. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यांचा वाहनचालकही फैसलाबाद मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आला.

६. नायर दांपत्याला आणीबाणीत अटक आणि सुटका

पुढे काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांच्या राजवटीने देशात आणीबाणी लागू करून नायर दांपत्याला अटक करून तुरुंगात डांबले; पण त्यांच्या अटकेमुळे अयोध्येत प्रचंड खळबळ उडाली आणि घाबरलेल्या सरकारने त्यांची कारावासातून सुटका केली. नंतर हे जोडपे अयोध्येला परतले आणि त्यांनी त्यांचे सार्वजनिक कार्य चालू ठेवले.

 ७. के.के. नायर यांचा अंतिम क्षण आणि अयोध्यावासियांनी त्यांना दिलेला भावपूर्ण निरोप !

वर्ष १९७६ मध्ये के.के. नायर यांना त्यांच्या गावी परतायचे होते; पण लोकांनी त्याला जाऊ दिले नाही; मात्र त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात स्वतःची गावी रहाण्याची इच्छा असल्याचे सांगत लोकांचा निरोप घेतला. नायर यांनी ७ सप्टेंबर १९७७ या दिवशी त्यांच्या गावी श्रीराममूर्तीच्या कमळाच्या चरणी शरणागती पत्करली. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून अयोध्येतील रहिवाशांना अश्रू अनावर झाले. त्यांचा अस्थिकलश घेण्यासाठी एक गट केरळला गेला होता. अस्थिकलशाचे मोठ्या सन्मानाने स्वागत करत तो कलश सजवलेल्या रथातून शरयू नदीत विसर्जित करण्यात आला, जेथे भगवान श्रीराम प्रतिदिन स्नान करत अन् सूर्याची पूजा करत. श्रीरामजन्मभूमीत हिंदूंना रामललाची पूजा करण्याचा महत्त्वाचा आदेश देणार्‍या के.के. नायर यांना विनम्र अभिवादन !’

(साभार : विविध संकेतस्थळे)