२२ जानेवारीला केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना अर्धा दिवसाची सुट्टी !

नवी देहली – येत्या २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय कर्मचार्‍यांना अर्धा दिवसाची सुटी घोषित करण्यात आली आहे. याद्वारे ते मंदिराच्या उद्घाटनाचा थेट प्रक्षेपित होणारा सोहळा पाहू शकणार आहेत.

सौजन्य इंडिया टूडे 

केंद्र सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, कर्मचार्‍यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी शाळा आणि महाविद्यालयेही अर्धा दिवसच चालू रहातील.