
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे. त्याविषयी बोलतांना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जातीचे सूत्र त्या त्या जातीतील नेत्यांना मोठे करण्यासाठी पुढे केले जाते. महाराष्ट्रात दुसर्या जातीविषयीचा द्वेष वाढत आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहर्याला हे डाग लावणारे आहे. महाराष्ट्र जातीपातीत गुंतत चालला आहे. सर्वांनाच जातीचा अभिमान असतो आणि असलाही पाहिजे; पण त्यापेक्षा जास्त दुसर्याच्या जातीचा द्वेष लोकांच्या मनात निर्माण झाला आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !