युवतीने महंमदचे छायाचित्र काढून रेल्वेच्या अॅपद्वारे केली तक्रार !
उडुपी – रेल्वेत एका युवतीचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी मणीपाल पोलिसांनी आरोपी महंमद शुरीम (वय २२ वर्षे) याला अटक केली. तो भटकळ येथील रहिवासी आहे.
Bhatkal based Mohammed Shuraim arrested on charges of sexual harassment of a software engineer on train.
📍Udupi Karnataka
Accused was returning after a course in a Jamaat in Mysore
Police swing into action after the victim reported the incident through the Indian Railway… pic.twitter.com/oaWTZSu3ky
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 30, 2024
उडुपीतील गुड्डेयांगडी येथील रहिवासी असलेल्या आणि बेंगळुरूमध्ये ‘आयटी’मध्ये काम करणारी एक युवती २४ ऑगस्ट या दिवशी रेल्वेने बेंगळुरूहून मुरुडेश्वरला जात होती. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता, जेव्हा रेल्वेने मुल्की स्थानक ओलांडले, तेव्हा आरोपी महंमद शुरीम याने वारंवार तिचा छळ करणे चालू केले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. युवतीने तत्काळ त्याचे छायाचित्र काढले आणि रेल्वेच्या अॅपद्वारे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. त्यानंतर उडुपी रेल्वे स्थानकावर पोचल्यानंतर तिने रेल्वे पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकावासनांध धर्मांध ! |