मुंबई – पश्चिम रेल्वेवर लोकलने प्रवास करणार्यांना ३१ ऑगस्टपासून पुढील महिनाभर प्रवासाचे वेगळे नियोजन करावे लागणार आहे. ५ दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. ९६० लोकल फेर्यांवर याचा परिणाम होणार आहे. मेल-एक्स्प्रेस फेर्यांची वाहतूकही विलंबाने होणार आहे. त्या ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील. वांद्रे टर्मिनसवरून सुटणार्या गाड्या ४० ते ४५ मिनिटे विलंबाने धावतील. सहावी मार्गिका कार्यान्वित करण्यासाठी हा ब्लॉक आहे. गणेशोत्सवाच्या १० दिवसांत मात्र हा ब्लॉक नसेल.
गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे गोरेगाव ते बोरिवली दरम्यान पाचव्या मार्गिकेवरील रेल्वेचा भार अल्प होईल. अप आणि डाउन रेल्वेसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील. यामुळे लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वक्तशीरपणात सुधारणा होण्यास साहाय्य होऊन अतिरिक्त जलद लोकल फेर्या चालवण्याचा पर्याय उपलब्ध होईल.