पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने वारंवार रस्त्यांची खोदाई !

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होत असलेला अपव्यय भरून देण्याचे दायित्व कोण घेणार ?

पुण्यात जुगार खेळणार्‍या २ माजी नगरसेवकांसहित १९ जणांना अटक

अशा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात समाजाला काय दिशा दिली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही अनैतिकतेची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना दाखला दिल्याप्रकरणी वॉलनट शाळेची चौकशी होणार !

चौकशी करून शाळेला सूचना करण्याच्या आदेशाचे पत्र आयोगाने शिक्षण उपसंचालकांना दिले. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याने आयोगाने कार्यवाही केली.

कलिंगड नेत असल्याचे सांगून धर्मांधाकडून ३ टन गोमांसाची तस्करी !

वाठार येथील गोरक्षक आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी केले रक्षण

रेल्वेतून परदेशी प्राण्यांची तस्करी करणार्‍या दोघांना पुणे ते लोणावळा या दरम्यान अटक

पुणे ते लोणावळा या दरम्यान मार्ग पोलिसांनी त्यांना संशयावरून कह्यात घेतले असता त्यांच्याकडून २७९ कासव, १ सहस्र २०७ इग्वाना आणि २३० फायटर मासे जप्त करण्यात आले आहेत.

पुष्टिपती विनायक जन्मानिमित्त पुण्यातील ‘दगडूशेठ गणपति’ समोर ५०० शहाळ्यांची आरास

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने २६ मे या दिवशी दगडूशेठ गणपति मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला.

पुणे येथील पालखी सोहळ्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आढावा बैठक

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या वर्षी पालखी सोहळा रहित करण्यात आला होता. यंदा पालखी सोहळा रहित होणार कि नाही ? पालखी सोहळ्याचे स्वरूप काय असेल ? या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये होईल.

राजभवनातून धारिका गहाळ झाल्याप्रकरणी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन

विधान परिषदेसाठी शिफारस करण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या नावाची धारिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे देण्यात आली होती. राज्यपालांनी १२ नावे गहाळ झाल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ मे या दिवशी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

आषाढीवारीसाठी संतांच्या पालख्या पायीच नेण्याची वारकर्‍यांची आग्रही मागणी !

श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. भाऊसाहेब महाराज गोसावी म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यातील सर्व घटकांच्या आम्ही संपर्कात आहोत. थोडक्या स्वरूपात का होईना, पायी वारी झाली पाहिजे, याविषयी आम्ही आग्रही आहोत.’’