मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार ! – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप (छायाचित्र सौजन्य : ANI)

पुणे – मराठा आरक्षणासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २४ मे या दिवशी पुण्यात पत्रकारांशी बोलतांना सांगितले. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४ वेळेला भेटीसाठी पत्र लिहिले; परंतु त्यांनी अद्याप भेटीसाठी वेळ दिलेली नाही, याविषयी चंद्रकांत पाटील यांनी ‘मराठा आरक्षणाचा विषय पंतप्रधान मोदींच्या हातात नाही. हा विषय राज्यांच्या सूचीमध्ये आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार याचिका जेव्हा चर्चेसाठी येईल, त्या वेळी अतिशय प्रभावीपणे केंद्र सरकार आपली भूमिका मांडणार आहे’, असे सांगितले.