कुतुब मीनार परिसरातील मशीद ही २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आल्याने ती हटवावी ! – देहली येथील न्यायालयात याचिका
जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !
जे सरकारने करायला हवे, त्यासाठी हिंदूंना न्यायालयात याचिका करून न्यायालयीन लढा द्यावा लागतो, हे अपेक्षित नाही !
मंदिरे गाडून मशिदी उभारल्याने भक्त आणि ईश्वर यांच्यावर झालेला अन्याय दूर होण्यासाठी आज धर्मनिष्ठ हिंदू अन् अधिवक्ते प्राणपणाने लढत आहेत. हिंदूंची मंदिरे पुन्हा त्यांना मिळावीत, यासाठी सरकारने आता कृतीशील व्हावे, हीच हिंदूंची अपेक्षा !
देहलीतील कुतुब मिनार परिसरात असलेली मशीद २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून बांधण्यात आली असून तेथे पुन्हा मंदिरांची पुनर्उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे.
ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,