मंदिरासाठी नियुक्त कर्मचारी केवळ हिंदूच असणार !
हिमाचल प्रदेश सरकारने घेतलेला निर्णय भाजप शासित प्रत्येक सरकारने घ्यावा, तसेच केंद्र सरकारनेही यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
शिमला – हिमाचल प्रदेशच्या भाषा, कला आणि संस्कृती विभागाने ‘हिंदू सार्वजनिक धार्मिक संस्था आणि न्यास अधिनियम-१९८४’ च्या कलम २७ अंतर्गत मंदिरे, शक्तिपिठे आणि धार्मिक संस्था यांना अर्पणाच्या स्तरावर मिळणारा पैसा, सोने, चांदी आता अहिंदूंवर खर्च करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच मंदिरांच्या सुरक्षेसाठी, तसेच अन्य कामांसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी केवळ हिंदूंच असणार आहेत. विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आर्.डी. धीमान यांनी याविषयीची अधिसूचना जारी केली आहे.
मंदिरों में केवल हिन्दू कर्मचारी, गैर-हिन्दुओं पर खर्च नहीं होगा चढ़ावे का पैसा व सोना-चाँदी: हिमाचल सरकार का बड़ा फैसला#HimachalPradesh #Templeshttps://t.co/X1FbuGb2aI
— ऑपइंडिया (@OpIndia_in) October 2, 2021
सध्या मंदिरांचा पैसा अधिकोषांमध्ये मुदत ठेवीमध्ये ठेवण्यात आला आहे. अर्पणातील पैशांतून मंदिरांचे पुजारी आणि कर्मचारी यांना वेतन दिले जाते. तसेच सोने आणि चांदी तिजोरीमध्ये जमा करण्यात येतात. त्यांना वितळवून त्याची नाणी बनवून विकण्याचा प्रस्ताव यापूर्वी फेटाळण्यात आला होता.