एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री !

‘‘संख्याबळ असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. फडणवीस यांच्या विश्‍वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.’’

गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ! – खासदार नवनीत राणा

सत्ता दूर जातांना पाहून सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी राज्यात धुमाकूळ घातला आहे. सत्तेचा दुरुपयोग वाढला आहे. राज्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी आणि एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गेलेल्या खर्‍या शिवसैनिकांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा.

मुंबईत १० जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश

मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालये, तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नगरसेवक यांची कार्यालये, निवासस्थाने-शाखा या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवसेना म्हणजे निखारा असून त्यावर पाय ठेवला, तर जाळून टाकू ! – मुख्यमंत्री

‘बंडखोरांना आधी त्यांचा निर्णय घेऊ द्या. माझ्यावर शिवसैनिकांचे अधिक प्रेम आहे’, असेही ते या वेळी म्हणाले. या वेळी उपस्थितांनी ‘गद्दारांना परत घेऊ नका’, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यावर ते म्हणाले, ‘‘त्यांना परत घेणारच नाही.’’

आजही आम्ही शिवसेनेतच आणि आमचा गट हाच अधिकृत ! – दीपक केसरकर, प्रवक्ते, एकनाथ शिंदे गट

शिवसेना पक्षप्रमुखांकडे केवळ १६ ते १७ आमदार असून आमच्याच गटाकडे पूर्ण बहुमत आहे. आमच्या मागण्या घेऊन आम्ही वारंवार पक्षप्रमुखांकडे गेलो; मात्र त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही. त्यामुळे आम्हाला वेगळा गट स्थापन करणे भाग पडले.

शिवसेनेकडून कितीही नोटिसा आल्या, तरी घाबरणार नाही ! – एकनाथ शिंदे

महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली असून धारिकांचे काम पूर्ण करण्यासाठी मंत्रालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मंत्र्यांची लगबग वाढली आहे !

पलानीसामी गटाने पनीरसेल्वम यांच्यावर बाटल्या फेकल्या !

जे राजकीय पक्ष अंतर्गत राजकारणात गुंतून एकमेकांवर आक्रमण करतात, ते राष्ट्रहितासाठी कधीतरी प्रयत्न करू शकतील का ? अशा राजकीय पक्षांमुळेच लोकशाही अपयशी ठरत आहे. या दु:स्थितीवरून सात्त्विक राजकारण्यांच्या ‘हिंदु राष्ट्रा’ची अपरिहार्यता लक्षात येते !

शिवसेनेचे आमदार असूनही आमच्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाची दारे बंद होती !

गेली अडीच वर्षे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची दारे शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही प्रवेश मिळाला नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून..

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविषयी तक्रार करूनही मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष ! – शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर

केवळ मीच नाही, तर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आमदारांना लगाम घालण्याविषयी मुख्यमंत्र्यांना सांगितले होते; पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार शिवसेनेचे नेते आमदार दीपक केसरकर यांनी केली.