मुंबई/गौहत्ती – ‘माझ्याकडे ५० हून अधिक, म्हणजे दोन तृतीयांशापेक्षा अधिकचे आमदार असून पुढची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे. सगळे निर्णय बैठकीनंतर घेतले जातील. शिवसेनेकडून मला कितीही नोटिसा आल्या, तरी आम्ही घाबरत नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या नोटिसा पाठवून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नये. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची महाशक्ती आमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केले.
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?
तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!
घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही.
यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.#RealShivsainik— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांस जाहीर पत्र लिहून तमाम शिवसैनिकांची व्यथा मांडणारे शिवसेना आमदार श्री संजय शिरसाठ यांची व्हिडिओ प्रतिक्रिया…. pic.twitter.com/Due5oDISAC
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ३७ आमदारांचे पत्र राज्यपालांना सादर !
एकनाथ शिंदे यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केल्याचे पत्र ३७ आमदारांनी विधानसभेचे उपसभापती नरहरि झिरवाळ यांना दिले. या पत्राची प्रत राज्यपाल कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवण्यात आली आहे.
सेनेचे ३७ आमदार फोडण्यात शिंदे यशस्वी?; सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा देणारं पत्र आजच राज्यपालांना देण्याची शक्यताhttps://t.co/rVJ8fXYlRZ
गोवामार्गे बंडखोर आमदार मुंबईत येणार…#EknathShinde #EknathSinde #Shivsena #BJP #MaharashtraPoliticalCrisis #MaharashtraPolitics— LoksattaLive (@LoksattaLive) June 23, 2022
२३ जूनच्या रात्री आणखी काही आमदारही गौहत्ती येथे पोचले आहेत. शिवसेनेचे चांदिवली येथील आमदार दिलीप लांडे, आमदार दादा भुसे, संजय राठोड. रवींद्र फाटक, तसेच अपक्ष आमदार किशोर जोडगेवार, आमदार सौ. गीता जैन आदींचा त्यात समावेश आहे. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ३९ आमदार आणि १४ अपक्ष आमदार, असे एकूण ५३ आमदार आहेत. आमदारांची संख्या आणखी वाढू शकते.
आमदारांचे सदस्यत्व रहित करा ! – शिवसेना
नोटीस देऊनही पक्षाच्या विधीमंडळ बैठकीला उपस्थित न राहिल्याने आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रहित करण्याची मागणी शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे.
शिवसेनेकडून आज विधानसभेचे उपसभापतींकडे पक्षाचे १२ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. #MaharashtraPolitics #Mumbai @ShivSena #ArvindSawant #SakalNews https://t.co/avWNcVWwJD
— SakalMedia (@SakalMediaNews) June 23, 2022
याउलट एकनाथ शिंदे गटाने ‘शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली मागणी अनधिकृत आहे’, असे म्हटले आहे.
बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल ! – नारायण राणे
शरद पवार गौहत्ती येथे गेलेल्या सर्व आमदारांना धमक्या देत आहेत. हे सर्व आमदार विधीमंडळात येऊन त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठीण होईल.
(सौजन्य : TV9 Marathi)
काही जणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली.
सुरक्षा रक्षकांनी एकनाथ शिंदे यांच्या पलायनाची पोलीस मुख्यालयाला दिली होती माहिती !
एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन सूरतच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती, तसेच ४ मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांनीही याविषयी माहिती दिली होती. यावर गृहविभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे समोर आले आहे. तथापि बंडखोर नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नाही. आमदारांच्या बंडाविषयीची माहिती पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेला कशी मिळाली नाही ?, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे आता संशयाची सुई दिलीप वळसे-पाटील यांच्या गृहविभागाकडे वळली आहे.
दिवसभरातील ठळक घडामोडी१. मुंबई येथील पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. शिवसेना भवनाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
७. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे शिवसैनिकांनी फेरी काढून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला. त्याचसमवेत शिवसेनेचे नेते आनंद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. |