प्रकाश आंबेडकरांचे पोलिसांना खुले आव्हान !
सांगली – येथे वंचित बहुजन आघाडीची ‘सत्ता संपादन निर्धार सभा’ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर पार पडली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हिंदुद्वेषी टिपू सुलतानच्या चित्राला हार घालून सभेला प्रारंभ केला. ‘टिपू सुलतानच्या चित्राला हार घातला, तर बघा’, असे काही जणांचे आदेश होते; पण पोलीस खात्याला आव्हान आहे की, ५ वर्षानंतर निवडणुका येतात आणि सरकार पालटते. आतापर्यंत सत्तेत सहभागी होण्याचा आम्ही कधीच प्रयत्न केला नाही; पण आता सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे’, असे प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी सांगितले.
Prakash Ambedkar I वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घातला टिपू सुलतान याचा फोटोला हार https://t.co/2vKolDIlER #prakashambedkar #vanchitbahujanaghadi #BJP #marathinews #breakingnews #VBAForIndia
— Maharashtramirror (@MaharshtraMiror) November 30, 2023
एकीकडे विविध समाजांच्या आरक्षण मागणीवरून राज्यात जातीजातींत तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असतांना प्रकाश आंबेडकरांच्या या निंदनीय कृतीमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. काही मासांपूर्वी क्रूरकर्मा आणि हिंदुद्रोही औरंगजेबाच्या स्टेटसवरून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यानंतर कोल्हापूर येथे परत टिपू सुलतानच्या आक्षेपार्ह स्टेटसवरून तणाव वाढला होता.
अशा प्रवृत्तीला आळा न घातल्यास त्याचा बिमोड करू ! – धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप, पुणे
धर्मांध विकृती असलेल्या टिपू सुलतानची जयंती महाराष्ट्रात साजरी केली जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. पोलिसांनी वेळीच असल्या प्रवृत्तीला आळा घालावा अन्यथा या प्रवृत्तीचा बिमोड करण्यास आम्ही समर्थ आहोत, अशी चेतावणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन तातडीने अशी धार्मिक तेढ निर्माण करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. |
संपादकीय भूमिका :
|