नाशिक – मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणारे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. ३० नोव्हेंबर या दिवशी येवला येथील सोमठानदेश गावात पहाणी केल्यानंतर ज्या मार्गावरून छगन भुजबळ यांचा ताफा गेला, त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडून रोष व्यक्त केला. या वेळी काही आंदोलकांनी भुजबळ यांच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच अर्धनग्न होत काळे शर्ट फिरवत भुजबळ यांचा निषेध केला. या वेळी आंदोलकांनी ‘छगन भुजबळ परत जा’च्या (‘गो बॅक’च्या) घोषणा दिल्या.
नाशिक : छगन भुजबळ यांना काळे झेंडे, ‘चले जाव’च्या घोषणा, येवल्यात मराठा आंदोलक आक्रमक#nashik #chhaganbhujbal #blackflags #marathaprotestorshttps://t.co/OT53Wnog1g
— LoksattaLive (@LoksattaLive) November 30, 2023
छगन भुजबळ सध्या नाशिकच्या दौर्यावर आहेत. ते अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या हानीची पहाणी करत आहेत; पण त्यांना या दौर्यात त्यांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेमुळे मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. लासलगाव येथील कोटमगाव रेल्वे पुलालगतही आंदोलकांनी भुजबळांच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘भुजबळ गो बॅक’चे फलक रेल्वे पुलाच्या भिंतीला चिकटवण्यात आले आहेत.
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.
विरोध करणारे बाहेरचे लोक ! – छगन भुजबळ
या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मला विरोध करणारे बाहेर गावचे आहेत. ते येथे येऊन विरोध करत आहेत. ही सर्व राजकीय मंडळी आहेत. त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. त्यांचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.