जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांविषयी श्री. धनंजय हर्षे यांनी केलेले चिंतन !

साधकाने जिज्ञासूला साधनेकडे वळवण्याच्या उद्देशाने त्याचा अभ्यास अथवा निरीक्षण देवाच्या अनुसंधानात राहून सहजभावात करायला हवे. जिज्ञासूंना संपर्क करण्याची सेवा परिणामकारक होण्यासाठी देवाने माझ्याकडून करून घेतलेले चिंतन पुढे दिले आहे.

साधकांनो, मनात येणार्‍या अहंयुक्त विचारांमुळे साधनेत होणारी हानी लक्षात घेऊन ते घालवण्यासाठी अंतर्मुखतेने कठोर प्रयत्न करा !

उत्तरदायी साधकांनी प्रेमाने आणि सहजतेने बोलावे, या अपेक्षेची पूर्तता न झाल्याने साधकांवर मनाला नकारात्मकता येणे, पूर्वग्रह निर्माण होऊन मनाचा संघर्ष होणे, बहिर्मुखता वाढणे इत्यादी परिणाम होत असल्याचे लक्षात येते.

‘ऑनलाईन’ साधना सत्संगासाठी संहितालेखनाची सेवा ‘गुरुपूजन’ या भावाने करणार्‍या पडेल (जि. सिंधुदुर्ग) येथील सौ. जोत्स्ना रविकांत नारकर !

वर्ष २०२० मध्ये कोरोनामुळे लागू झालेल्या दळणवळण बंदीमुळे साधकांना सेवा करणे शक्य होणार नव्हते. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू झाले. ही सेवा करतांना त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा, त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

श्रीमती मेघना वाघमारे (वय ६४ वर्षे) यांचे खडतर जीवन आणि त्‍यांनी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा

रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करणार्‍या साधिका श्रीमती मेघना वाघमारे यांच्‍याविषयी त्‍यांचा मुलगा आणि मुलगी यांना जाणवलेली सूत्रे काल पाहिली. आज पुढील भाग पाहूया.

सोलापूर येथील कु. वैष्णवी उमाकांत दसाडे यांना साधनेच्या प्रवासात स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

‘आतून मनातून सूक्ष्मस्तरावर विचारांमधे पालट घडत जातो, भावस्थिती चांगली अनुभवता येत असते’, असे जे पालट होतात, ते म्हणजे ‘सूक्ष्मातील प्रगती’ असे आपण म्हणू शकतो. याच प्रगतीतील आनंद कृतज्ञताभावाने अनुभवणे हीच खरी प्रगती, हे लक्षात आले.

साधकांनो, स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया प्रामाणिकपणे राबवून अन् गुर्वाज्ञापालन करून गुरुकृपा ग्रहण करूया !

स्‍वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ? हे अन्‍य संप्रदायात शिकवले जात नाही. ‘दशापराधविरहित परिपूर्ण साधना केली, तरच मोक्षप्राप्‍ती होणार आहे’, ही प.पू. डॉक्‍टरांची शिकवण आहे.

कर्नाटक राज्‍यातील साधकांच्‍या साधनेचे सुकाणू हाती धरून त्‍यांना मार्गदर्शन करणारे सनातनचे ७५ वे समष्‍टी संत पू. रमानंद गौडा !

अलीकडे ३ – ४ मासांत मला पू. रमानंद गौडा ​यांचे दिव्‍यत्‍व आणि व्‍यापकत्‍व जवळून अनुभवता आले. संतांचे किंवा गुरूंचे वर्णन करणे अशक्‍य आहे, तरीही माझ्‍या अल्‍प बुद्धीला जाणवलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.

शिकण्याची वृत्ती आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या मोहाली, चंडीगड येथील सौ. अमिता शर्मा (वय ६० वर्षे) !

त्या मंदिरात गेल्यावर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना साधना व राष्ट्र आणि धर्म यांविषयीही माहिती सांगतात. त्यांच्या मनात ‘मी एकटी आहे, दूर रहाते, तर कसे होणार ?’, असा विचार येत नाही.

केवळ भ्रमणभाषवर संपर्क करून विज्ञापने आणि अर्पण मिळवण्याची सेवा करता येते, याची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने जाणीव होणे

कन्नड भाषेतील ‘पंचांग’, ‘सनातन प्रभात’ यांसाठी सर्व विज्ञापने मिळवण्याची सेवा मार्च अखेरपर्यंत पूर्ण होते हे कौतुकास्पद आहे.कर्नाटकातील साधकांकडून श्रद्धा, भाव आणि तळमळ या गोष्टी मला शिकायला मिळाल्या.