राखीपौर्णिमा आणि तिचे महत्त्व

श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १५.८.२०१९ या दिवशी राखीपौर्णिमा आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते. यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने आपले रक्षण करावे, ही भूमिका असते. या दिवशी भाऊ बहिणीला पैसे अथवा तिला उपयोगी पडेल, अशी वस्तू ओवाळणी म्हणून देतो.

कर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद

शिमोगा (कर्नाटक) जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळूरू, मैसूर आणि मंगळूरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत.

संस्कृतची वैशिष्ट्ये

संस्कृत शिकल्याने स्मरणशक्तीत वाढ होऊन व्यक्ती बुद्धीवान होते, असे मत शिवाला येथील वाग्योग चेतना पिठाचे प्रा. भागीरथ प्रसाद त्रिपाठी यांनी व्यक्त केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF