‘आत्मिक आनंद’ मिळवा !

सामाजिक माध्यमांमध्ये एक ‘व्हिडिओ’ नुकताच प्रसारित झाला. यात व्यक्ती तिचा आनंद बाह्य गोष्टींमध्ये शोधत असते. सावळा किंवा काळा रंग असलेल्या व्यक्तींना गोरे व्हायचे असते, कुरळे केस असलेल्या व्यक्तींना सरळ केस हवे असतात आणि सरळ केस असणार्‍या व्यक्तींना कुरळे केस हवे असतात. एखादी वस्तू आपल्याकडे नाही; पण तीच दुसर्‍याकडे असल्यास आपल्याला हवी असते. स्वत:चे उत्पादन विकण्यासाठी … Read more

ग्राहकराजा, जागा हो ! 

संपूर्ण विश्व इंधनावर चालते. भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. देशात विविध आस्थापनांचे सहस्रो पेट्रोलपंप आहेत. देशाच्या दळणवळणामध्ये इंधन हा अविभाज्य घटक असून वाहनांचाही तितकाच सहभाग आहे.

जुनं ते सोनं !

लहान मुले पूर्वी मैदानी खेळ खेळत, आता ती जागा भ्रमणभाषने घेतली असल्याने मैदाने ओसाड पडली आहेत. भ्रमणभाषच्या विळख्यात अडकलेली हीच मुले व्याधीग्रस्त होऊन रुग्णालये किंवा चिकित्सालये अशा ठिकाणी दुर्दैवाने दिसत आहेत.

दुष्‍प्रवृत्तीचा नाश !

शासनाने जनतेची प्रवृत्ती पालटण्‍यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे, अध्‍यात्‍म जगायला शिकवणे आवश्‍यक आहे. सखोल मुरलेली दुष्‍प्रवृत्ती नष्‍ट करण्‍यासाठी व्‍यक्‍तीमध्‍ये आमूलाग्र पालट घडवणारे अध्‍यात्‍मशास्‍त्र हेच योग्‍य शस्‍त्र आहे.

‘वासुदेवा’ची स्वारी !

सध्या चर्चेत आलेला विषय म्हणजे ‘वासुदेव’ ! डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेला किंवा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसर्‍या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी…

असाही एक विवाह !

समाजातील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे असे सार्वजनिक आणि घरगुती कार्यक्रम चांगल्या पद्धतीने केल्यास इतरांसाठी तो आदर्श ठेवला जातो. समाजात यातून चांगला संदेशही जातो. त्यामुळे विवाह, म्हणजे ‘शक्तीप्रदर्शन’ आणि गोंधळ यांपुरता मर्यादित न रहाता त्यातून धार्मिकताही टिकून रहाते.

पुणे शहराची मानहानी !

पालकांनीही मौजमजेच्या नावावर आपल्या मुलांना अमली पदार्थ, कंडोम यांच्या आहारी जाऊ न देता त्यांच्यावर योग्य ते संस्कार करायला हवेत. भारताची मानहानी करणार्‍या अशा गोष्टी टाळणे, हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियाचे कर्तव्य आहे !

दुटप्पी राहुल गांधी !

राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करावासा वाटला असता, तर त्यांना देहली ते पुणे हा काही मिनिटांचा विमान प्रवास करून न्यायालयात त्यांची बाजू मांडून संसदेच्या कामात सहभागी होणे सहज शक्य होते; पण त्यांनी तसे न करता सवलत घेऊन संभल येथे जाऊन धर्मांधतेचे राजकारण केले.

बालिकाही असुरक्षित !

पुणे येथे ३ वर्षांच्या मुलीवर ९ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केला. ३ वर्षांची मुलगी ‘दादा’, ‘दादा’ म्हणत ज्या मुलासमवेत खेळत होती, त्याच मुलाकडून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर त्या बालमनावर काय बेतले असेल…

यशाचे गमक जाणा !

नेहा आणि गुकेश यांची उदाहरणे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. तरुण पिढीने त्यांच्याप्रमाणे मनोनिग्रह केल्यास प्रत्येकाला यशोशिखर गाठता येईल, हे निश्चित !