आपत्कालीन साहाय्यासाठी सातारा नगरपालिकेची ‘हेल्पलाईन’ सेवा

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीन ‘हेल्पलाईन’ सेवेचा क्रमांक ०२१६२-२३२६८६ असा आहे.

रोगराई पसरू नये म्हणून महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवा ! – सांगली जिल्हाधिकारी

रोगराई पसरू नये, यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम गतीने राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्त नागरिकांना ‘ब्लँकेट’ वाटप

शिवसेना आणि ‘वसुधा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त भागातील गरजू १०० नागरिकांना उबदार ‘ब्लँकेट’चे वाटप करण्यात आले.

पूरग्रस्त भागात केंद्राच्या निधीतून कामे करावीत ! – खासदार श्रीनिवास पाटील

अतीवृष्टीमुळे झालेल्या हानीभरपाईसाठी निधी द्यावा.

आपत्काळात तातडीच्या बचावकार्यासाठी कोकणात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक नियुक्त करावे ! – कु. अदिती तटकरे, राज्य उद्योगमंत्री

रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी मागील ५ वर्षांत ३ वेळा चक्रीवादळ आले होते. २-३ वेळा पूर आला होता. अशा वेळी स्थानिक पातळीवरील पथकांना बचावकार्य करण्यास अडचण येते.

राज्यात अतीवृष्टीमुळे ४ दिवसांत २०० जणांचा मृत्यू, तर २४ जण घायाळ !

आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !

पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये, यासाठी स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यात यावा. अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने चालू होईल, यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या.

दरड आणि पूर यांमुळे राज्यात ६ सहस्र कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !

पिकांची हानीभरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचे पुनर्वसन करणे, तसेच लोकांना साहाय्य करणे आदींसाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

नदीवरील तुटलेल्या पुलाला शिड्या लावून नागरिकांचे स्थलांतर !

जितकरवाडी येथे गत २-३ दिवसांपासून अतीवृष्टी चालू आहे. त्यामुळे डोंगर खचून दरडी कोसळत आहेत. घरांपासून काही अंतरावर हा प्रकार चालू असल्यामुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतीवृष्टीने हानी झालेले साकव, पूल आणि रस्ते यांची कामे तातडीने पूर्ण करा ! – पालकमंत्री उदय सामंत यांची प्रशासनाला सूचना

यानंतर पालकमंत्री सामंत यांनी तिलारी प्रकल्प, जिल्ह्यातील पूरस्थिती आणि कोरोनाविषयीची स्थिती या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.