आपत्कालीन साहाय्यासाठी सातारा नगरपालिकेची ‘हेल्पलाईन’ सेवा

उपनगराध्यक्ष मनोज शेंडे

सातारा, २९ जुलै (वार्ता.) – सातारा शहरात आपत्कालीन स्थितीत तातडीने साहाय्य पोचवण्यासाठी सातारा नगरपालिकेने २४ घंटे कार्यरत असणारी नवीनहेल्पलाईनसेवा चालू केली आहे, अशी माहिती उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नवीनहेल्पलाईनसेवेचा क्रमांक ०२१६२२३२६८६ असा आहे. सध्या सातारा शहरात जोरदार पाऊस चालू आहे. यांमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचणे, दरड कोसळणे, वृक्ष उन्मळून पडणे, धोकादायक इमारत कोसळणे आदी घटना घडू शकतात. अशा आपत्तींमध्ये नागरिकांनी वरीलहेल्पलाईनक्रमांकावर संपर्क साधावा. हा संपर्क क्रमांक २४ घंटे सातारावासियांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे