‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

(‘एक देश एक निवडणूक’ म्हणजे एकाच वेळेला देशात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यांच्या निवडणुका घेणे)

नवी देहली – केंद्रशासनाने १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात सरकार ‘एक देश एक निवडणूक’ यावर  विधेयक आणण्याची शक्यता आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रशासनाने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती ‘एक देश एक निवडणूक’ या संदर्भात कायदेशीर गोष्टी पहाणार आहे. यासाठी सर्वसामान्यांचे मतही घेतले जाणार आहे.