भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलाल जिहाद’च्या विरोधात व्यावसायिकांचे प्रबोधन !

भोपाळ – हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून चालू असलेल्या देशविरोधी षड्यंत्राला जनजागृती आणि बहिष्कार यांच्या माध्यमातून विरोध करण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. भारत विकास परिषदेचे श्री. कमल प्रेमचंदानी यांनी व्यावसायिकांसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विविध व्यापारी आस्थापनांनी ‘शासनाला निवेदन पाठवून कथाकारांच्या माध्यमातून समाजात जनजागृती करू’, असा निर्णय घेतला. याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राम बन्सल, नगराध्यक्ष राजेश हिंगोरानी, उद्योगपती विष्णु बन्सल, कन्हैयालाल मोटवानी आदी व्यापारी उपस्थित होते.