कुंभमेळ्यात रुग्ण सेवेसाठी ५४ रुग्णवाहिका उपलब्ध

कुंभमेळ्यात पवित्र (शाही) स्नानाच्या दिवशी आपत्कालीन सेवेत २ एम्.आय. रुग्णवाहिका, ५४ चारचाकी आणि ४० दुचाकी रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे मेळाअधिकारी डॉ. अर्जुनसिंह सेंगर यांनी दिली.

महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी

भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दळणवळण बंदीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद ! – केंद्र  सरकारची माहिती

एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये देशातील १० सहस्र ११३ आस्थापने बंद झाली आहेत. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वेच्छेने त्या बंद झाल्या आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.

जुना आखाड्याद्वारे दुर्गम भागांत शाळा-महाविद्यालये यांची उभारणी करण्यात येणार

यासाठी जुन्या आखाड्याच्या वतीनेही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘प्रँक व्हिडिओ’च्या विरोधात केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्याकडे तक्रार !

सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाने खरेतर स्वत:हून या विरोधात कारवाई करणे अपेक्षित आहे. नेहमी कुणा संघटनांनीच असे अपप्रकार समोर आणल्यावर प्रशासनास जाग येणे, लज्जास्पद !

ममता बॅनर्जी घायाळ झाल्याने निवडणुकीत दीड मास प्रचार करू शकणार नाहीत !

नंदीग्राम येथे प्रचार करत असतांना एका लहान अपघातात ममता बॅनर्जी यांच्या पायाचा अस्थीभंग झाल्याने पुढील दीड मास त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

अंबानींना ‘हेलिपॅड’ची अनुमती मिळण्यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या वाहनाचे प्रकरण घडवून आणले  ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महत्त्वाच्या सूत्रावर चर्चा होऊ नये, यासाठी भाजपनेच या सूत्रावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

तीरथ सिंह रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री

तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च या दिवशी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून भाजपकडून हटवण्यात आल्यानंतर तीरथ रावत यांची सकाळी विधीमंडळ सदस्यांकडून निवड करण्यात आल्यावर सायंकाळी त्यांचा शपथविधी करण्यात आला.

‘आयएन्एस् करंज’ ही पानबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखली जाणारी ‘आयएन्एस् करंज’ ही अत्याधुनिक पाणबुडी १० मार्च या दिवशी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. मुंबई येथील पश्‍चिम कमांड नौदलाच्या मुख्यालयामध्ये नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमवीर सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांचे त्यागपत्र

उत्तराखंड राज्याचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन सादर केले. त्यांच्याविषयी पक्षांतर्गत असलेल्या अप्रसन्नतेतून त्यांना पक्षाने त्यागपत्र देण्यास सांगितल्याचे म्हटले जात आहे.