आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा फटकारले !

नवी देहली – देहलीला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. प्रत्येक दिवशी ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन देहलीतील रुग्णांना दिला पाहिजे. पुढील आदेशापर्यंत हा पुरवठा असाच केला जावा, असा आदेश देतांनाच सर्वोच्च न्यायालयाने ‘आम्हाला सरकारच्या विरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण करू नका’, अशा शब्दांत फटकारले. ‘देहली सरकारने आम्हाला प्रतिदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जावा’, अशी मागणी केली असतांना केंद्राने मात्र असमर्थता दर्शवली आहे. यावरून न्यायालयाने ६ मे आणि ७ मे या दोन्ही दिवशी फटकारले.