कर्नाटकला प्रतिदिन १ सहस्र २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – कर्नाटक उच्च न्यायालयाने ५ मे या दिवशी कर्नाटक राज्याला प्रतिदिन १ सहस्र २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानंतर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते; मात्र न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळत कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. सध्या कर्नाटकमध्ये ९६५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन पुरवठा होत आहे.