नवी देहली – भारतात कोरोनाच्या संकटाच्या काळात देशातील अनेक लहान आणि मोठ्या मंदिरांनी साहाय्य चालू केले आहे. तसेच आता विदेशातील हिंदु मंदिरांनीही भारताला साहाय्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
१. थायलंडची राजधानी बँकॉक येथील प्राचीन हिंदु समाज देव मंदिराने भारतियांसाठी ऑक्सिजन पाठवले आहे. थायलंडच्या वायूदलाच्या विमानाद्वारे ऑक्सिजन पाठवण्यात येत आहे. मंदिराच्या सचिवांनी सांगितले की, मानवतेच्या नात्याने आम्ही हे साहाय्य करत आहे.
२. लंडन येथील श्री स्वामीनारायण मंदिराने भारतियांसाठी धन गोळा केले आहे. यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे. आतापर्यंत ५ कोटी १० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ब्रिटेनच्या स्विंडन येथील हिंदु मंदिरांनी वैद्यकीय उपकरणे पाठवली आहेत.
UK Indians rally to help during country’s Covid crisis https://t.co/Jgg0quOMgN
— BBC News (UK) (@BBCNews) April 28, 2021
३. सौदी अरेबियातील अबु धाबीमधील हिंदु मंदिराने ऑक्सिजन टँक आणि सिलिंडर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे मंदिर प्रतिमहा ४४० टन ऑक्सिजन आणि ५० सहस्र सिलिंडर पाठवणार आहे.