गडचिरोली येथे १३ नक्षलवादी ठार !

नक्षलवाद कायमचा संपुष्टात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांना नजरकैदेत ठेवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील प्रशासनाने अवैध मशीद पाडल्याचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध

त्यांचा दावा आहे की, ही मशीद १०० वर्षे जुनी होती आणि तिचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे होता. याची नोंदणीही बोर्डाकडे आहे.

कोरोनामुळे बेरोजगारीचा दर उच्चांकी स्तरावर !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बेरोजगारीचा दर १४.३४ टक्के इतक्या उच्चांकी स्तरावर गेला आहे, असे निरीक्षण ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

खांडवा येथे १७ वर्षे जुन्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्याचा अयशस्वी प्रयत्न !

येथे राज्याचे वनमंत्री विजय शहा यांनी रुग्णवाहिकेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला असता ती चालूच झाली नाही. तिला धक्काही मारण्यात आला, तरीही ती जागची हलली नाही.

रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार ९९ सहस्र १२२ कोटी रुपये !

देश कोरोनामुळे संकटात असतांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला ९९ सहस्र १२२ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या केंद्रीय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बेंगळुरू येथे बनावट कोरोना प्रमाणपत्र देणारे २ डॉक्टर गजाआड

लोकांना बनावट कोरोना प्रमाणपत्र देणार्‍या आणि रेमडेसिविर इजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या चामराजपेट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील २ डॉक्टरांना पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले.

वर्ष २०१३ मधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी पत्रकार तरुण तेजपाल यांची  निर्दोष मुक्तता

सहकारी युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तहलकाचे संस्थापक तथा माजी संपादक पत्रकार तरुण तेजपाल यांची म्हापसा येथील सत्र न्यायालयाने २१ मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली.

‘इस्रो’ला स्वदेशी ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’च्या निर्मितीत यश !

इस्रोने कोरोनाच्या काळात रुग्णांना साहाय्यभूत ठरून ‘ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स’ची निर्मिती करणे कौतुकास्पद !