प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा आणि ‘चिपको’ आंदोलन

ऋषिकेश – प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा (वय ९४ वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. ऋषिकेश येथील ‘एम्स्’ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता. वर्ष १९७४ मध्ये या वृक्षतोडीच्या विरोधात स्थानिक महिला वृक्षांना चिकटून उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे जगभरात हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन या नावाने प्रसिद्ध झाले. बहुगुणा यांनी हिमालयाच्या रक्षणासाठी आयुष्यभर आवाज उठवला. त्यामुळे त्यांना ‘हिमालयाचे रक्षक’ असेही म्हटले जाते.