लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – प्रशासनाने राज्यातील बाराबंकीच्या रामसनेहीघाट तालुक्यातील गरीब नवाज मशीद अवैध ठरवून ती पाडली. याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध होत आहे. त्यांचा दावा आहे की, ही मशीद १०० वर्षे जुनी होती आणि तिचा मालकी हक्क वक्फ बोर्डाकडे होता. याची नोंदणीही बोर्डाकडे आहे. या कारवाईच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही बोर्डाने सांगितले. बोर्डाने मशीद पाडणार्या सरकारी अधिकार्यांना निलंबित करून त्यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच मशीद पुन्हा बांधून द्यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.