भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत

भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्‍चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.

मलेशियामध्ये चर्च किंवा मंदिरे यांमधील कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यास मुसलमानांवर बंदी

‘इम्पॅक्ट मलेशिया’ संस्थेच्या सदस्यांनी चर्चला दिलेल्या भेटीविषयी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ख्रिस्ती नसलेल्या लोकांनी चर्चला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

‘गझवा-ए-हिंद’वर शिक्‍कामोर्तब !

भारतीय मदरशांमधून बहुसंख्‍यांकांच्‍या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्‍ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्‍यामुळे ज्‍या प्रकारे सौदी अरेबियामध्‍ये एकही मदरसा नाही, त्याप्रमाणे भारतात ही बंदी घालणे आवश्‍यक आहे. तरच भारत गझवा-ए-हिंदच्‍या धोक्‍यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !

काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी

कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्‍या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.

सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !

सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्‍या रमझान मासाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात कधीतरी असे होईल का ?

राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरता समर्पित व्हा !

‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कमांडर आणि राज्यपाल याची हत्या !

या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. 

‘तुर्कीये’चा धडा !

भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !

इराणमध्ये बॅडमिंटन स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय महिला खेळाडूला पदक घेतांना घालावा लागला हिजाब !

इराण कट्टर इस्लामी देश आहे. त्यामुळे भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच महिला संघटना या घटनेच्या संदर्भात शेपूट घालणार, यात आश्‍चर्य ते काय ?

ब्राझिलमध्‍ये लोकशाही संपेल ?

समाजाचा मानसिक, बौद्धिक आणि आध्‍यात्मिक स्‍तर उंचावण्‍यासाठी व्‍यवस्‍थेपासून समाजधुरिणांपर्यंत सर्वांनी झटावे लागते. ब्राझिलमधील हिंसाचारावरून ‘सामाजिक भान’, ‘लोकशाहीवरील आघात’ यांवर चर्चा करणार्‍यांनी सामाजिक सुसंपन्‍नतेसाठी उपाययोजना काढल्‍यास जगाचे भले होईल !