Maldives Deportation Of Indians : मालदीव विविध गुन्ह्यांतील ४३ भारतीय आरोपींना बाहेर काढणार !

एकूण १२ देशांच्या १८६ नागरिकांचा समावेश, चीनचा मात्र एकही नागरिक नाही !

माले (मालदीव) – भारतासमवेतच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मालदीव ४३ भारतियांना देशातून बाहेर काढणार आहे. त्यांच्यावर विविध गुन्हे नोंद आहेत.

सौजन्य : ब्राइट आयडिया 

मालदीवने एकूण १२ देशांतील १८६ नागरिकांना देशातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांत चीनचा मात्र एकही नागरिक नाही. (मालदीवचे आत्मघातकी चीनप्रेमच त्याला एके दिवशी धडा शिकवेल ! – संपादक)