Hindu Mandir In Bahrain : आता बहरीन या इस्लामी देशात हिंदु मंदिर बांधले जाणार !

अबु धाबीमधील मंदिर

नवी देहली – संयुक्त अरब अमिरातनंतर आता बहरीन या इस्लामी देशात हिंदु मंदिर बांधले जाणार आहे. त्यासाठी या देशाच्या राजाकडून भूमी घेण्यात आली आहे.

‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ म्हणजेच बी.ए.पी.एस्.

(सौजन्य :  Republic Bharat)

या मंदिराच्या बांधकामास लवकरच प्रारंभ होणार आहे. हे मंदिरही अबु धाबीमधील मंदिराप्रमाणेच विशाल असणार आहे. हे मंदिरही ‘बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था’ म्हणजेच बी.ए.पी.एस्. बांधणार आहे.