माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी मालदीवच्या वस्ती असलेल्या १८७ बेटांपैकी ३६ बेटे चिनी पर्यटन आस्थापनांना भाड्याने दिली आहेत.
चिनी आस्थापने १२ सहस्र कोटी रुपये खर्च करून या बेटांचा पर्यटनासाठी विकास करणार आहेत. मागील चीन दौर्यात राष्ट्रपती मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक पर्यटक पाठवण्याचे आवाहन केले होते. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या २ मासांत ४ लाख चिनी पर्यटक मालदीवमध्ये पोचले होते.
संपादकीय भूमिकाभारताने मालदीवमध्ये चीनचा अधिक वावर वाढण्यापूर्वी मालदीव कह्यात घेतले पाहिजे आणि भविष्यातील संकटापासून देशाचे रक्षण केले पाहिजे ! |