सचिन वाझे यांच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज करणार !

वाझे यांच्या विरोधात काही महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात जबाब देण्यास सिद्ध आहेत. त्यामुळे सचिन वाझे यांना कह्यात घेण्यासाठी आम्ही २५ मार्च या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात अपील करणार आहोत, अशी माहिती आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारविरोधात व्यक्त केला असंतोष !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच राज्याची कोरोनाविषयक स्थिती यांविषयी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांशी चर्चा केली.

पुणे शहरापेक्षा पुणे ग्रामीणमध्ये महिला अत्याचाराचे गुन्हे अधिक असल्याचा ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’चा अहवाल

राज्यात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ४८ टक्के असतांना महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १३ टक्के आहे.

अनिल देशमुख यांनी धमकी दिल्यामुळे शरद पवार यांनी भूमिका पालटली का ? – सुधीर मुनगंटीवार, भाजप

या वेळी सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘ज्येष्ठ पोलीस अधिकार्‍याने गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सन्मान यांचे धिंडवडे निघाले आहेत.

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सीमकार्ड पुरवणार्‍याला गुजरातमधून अटक

या प्रकरणात १४ सीमकार्ड वापरण्यात आली असल्याचे आतंकवादविरोधी पथकातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील ‘सी.सी.टी.व्ही.’ची तपासणी

या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांच्या त्यागपत्रासाठी मुंबईत आंदोलन करणारे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना अटक

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या त्यागपत्रासाठी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर आंदोलन करणार्‍या भाजपच्या नेत्यांना पोलिसांनी अटक केली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर वसुलीचे सखोल अन्वेषण करण्याचा उच्च न्यायालयाचा ‘कॅग’ला आदेश

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाविषयी असा करार उपलब्ध नाही. टोलविषयी अधिसूचना घोषित करतांना प्रकल्पाचा व्ययही घोषित केलेला नाही, असे या याचिकेत म्हटले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे नवे आयुक्त

मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन ! – हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, मुंबई

मुंबई पोलीस सध्या एका कठीण समस्येतून जात आहेत. ती समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझी नियुक्ती केली आहे. येत्या काळात मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीन.