मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सीमकार्ड पुरवणार्‍याला गुजरातमधून अटक

डावीकडून मनसुख हिरेन , मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली जीप

मुंबई – मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सीमकार्ड पुरवणार्‍या एकाला आतंकवादविरोधी पथकाने गुजरात येथून कह्यात घेतले आहे. या प्रकरणात १४ सीमकार्ड वापरण्यात आली असल्याचे आतंकवादविरोधी पथकातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. २२ मार्च या दिवशी एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक हे या प्रकरणाचे अन्वेषण करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकात दाखल झाले आहेत.