ठेकेदार राष्ट्रीय महामार्गाची कामे करत नाहीत ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

२३ मार्च या दिवशी पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविषयीचा तारांकित प्रश्न आमदार अरुण लाड यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर उत्तर देतांना चव्हाण यांनी वरील वक्तव्य केले. 

(म्हणे) ‘शालेय अभ्यासक्रमात ‘श्रीमद्भगवद्गीते’चा समावेश करणार नाही !’

‘श्रीमद्भगवद्गीता’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून त्यात जीवनाचे सार आहे. त्यामुळे गीतेचा अभ्यास म्हणजे खर्‍या अर्थाने जीवनोद्धाराचा मार्ग आहे, हे शिक्षणमंत्री लक्षात घेतील का ?

मागील ११ वर्षांत २१९ मराठी शाळा बंद, तर ६९ सहस्र १०० विद्यार्थी घटले ! – प्रवीण दरेकर

पालकांनी पाल्यांना मराठी शाळांतून काढल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या घटली आणि शाळा बंद कराव्या लागल्या. विद्यार्थी संख्या घटल्यामुळे शिक्षकांची संख्या न्यून करावी लागली. याविषयी पालकांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे.

महावितरण आस्थापनाचे भ्रष्ट अधिकारी सुमित कुमार यांना निलंबित करण्याचा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा आदेश !

सुमित कुमार यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, अधिकार्‍यांना धमकावणे आणि नैतिक अधःपतनाच्या गंभीर तक्रारी वरील आमदारांनी डॉ. नितीन राऊत यांच्या निदर्शनास आणून दिल्या. सुमित कुमार हे स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करत अनधिकृतपणे पैशांची मागणी करतात.

१८१ सोनोग्राफी चाचणी केंद्रांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा, तर १५ केंद्रांची मान्यता रहित ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

गर्भलिंग निदान चाचणीच्या संदर्भात कायदेशीर तरतुदींचा भंग केल्याचे प्रकरण

हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची गृहराज्यमंत्र्यांची घोषणा !

मागील वर्षभरात जुगाराच्या ४२९, तर मद्याच्या १ सहस्र ६० तक्रारी ! एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैध धंदे हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल !

विधान परिषदेतील १० सदस्यांचा निरोप समारंभ !

पुढील विधीमंडळाच्या अधिवेशनापूर्वी या आमदारांच्या सदस्यत्वाचा कालावधी संपत आहे.

नगर जिल्ह्यातील तळे, विहीर आणि शिंदे गावांत जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात पाणीपुरवठा करू ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

नगर जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीचे काम पूर्ण करून १ वर्षात या तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याचे दायित्व घेतो, असे आश्वासन पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २३ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधीवर उत्तर देतांना दिले.

राज्यामध्ये प्रति १०० किलोमीटर अंतरावर कर्करोग उपचारांसाठी उपकेंद्र चालू केले जाईल ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मंत्री देशमुख यांनी ‘हाफकिन महामंडळाकडून वर्ग झालेले पैसे पुन्हा घेऊन जुन्या जागेत रुग्णालयाचे बांधकाम करून यंत्रणा बसवण्यात येईल’, असे घोषित केले.

द्विभाषिक पाठ्यपुस्तकांद्वारे ‘एकात्मिक पुस्तक’ ही संकल्पना राबवण्यात येणार ! – वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे न्यून करण्यासाठी निर्णय